आरक्षण - माझे मत.
आरक्षण - माझे मत. सध्या आरक्षणावर खूप जोर आहे. समाजाचा प्रत्येक घटक उठतो आणि आरक्षण मागतोय. पण हा विचार कोण करतंय का, कि भारता सारख्या अतिभव्य अश्या राष्ट्रात सगळ्यांनीच आरक्षण घेतले तर कोणाला काय मिळेल? याने आपण आपलया संधीची संभवनीयता कमी करतोय. १०% आरक्षण नसले तर आपल्याला पूर्ण १००% संभाव्य संधी उपलब्ध असतात. तेच आरक्षणानंतर १०० पैकी दहाच संभाव्य संध्या उपलब्ध होतात. हे म्हणजे पूर्ण केक खायची संधी असताना आपण फक्त एका तुकड्यात समाधानी होण्यासारखा आहे. सध्याचे युग स्पर्धात्मक आहे आणि दुर्दैवाने आरक्षणाच्या गाजरापायी आपण आपल्या नव्या युगाची लढाऊ वृत्ती बोथट करतो आहोत. हे नक्कीच पूर्ण राष्ट्रसाठी उपयुक्त नाही. आरक्षण, ते हि जाती वरून असल्यामुळे आणि त्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात वाढल्या मुळे, खऱ्या अर्थाने गरजू, हुशार, होतकरू विद्यार्थी / नागरिक पर्यायी देश सोडत आहेत. एका अभ्यासानुसार, भारतातून परदेशात स्थलांतरीत करणाऱ्यांची संख्या २००३ च्या तुलनेत २०१३ मध्ये ८५% ने वाढीव होती. आणि भयावह गोष्ट हि कि त्यातील ५५% पेक्षा अधिक हे शास्त्रज्ञ,गणितज्ञ, अर्थतज्ज्ञ, डॉक्टर, अभियं...