Posts

|| तमसो मा ज्योतिर्गमय ||

मित्रांनो , आज हि बऱ्याच घरांमध्ये रोज नित्यनियमाने एका विशिष्ट वेळी देवा सोमोर दिवा किंवा मेणबत्ती लावली जाते. का ? अहो इथे तेल महाग झालंय तरी का पेटवता दिवा ? काय असतं मनात त्या वेळेस ? हेच असेल नक्की कि काही होणार नाही दिवा वगैरे लावून ... उगाच लावायचा म्हणून लावतोय ... काही उपयोग नाही. मला एक तर किती त्रास आहे .. कर्ज आहे , कामाचा व्याप आहे , मुलीच्या लग्नाचं टेन्शन , आई वडीलांचं आजारपण , बापरे हे सगळं असताना मी काय देवा समोर दिवा लावतोय , उदबत्ती लावतोय , मेणबत्ती लावतोय .... मला माझं प्राधान्य कळत नाही .... वेडे आहेत मला हे रोज करावं असं सांगणारे किंवा सांगून गेलेले... बावळट होते माझे वाड-वडील आणि मीही तेवढाच बावळट आहे कारण माझ्या मुलांकडून पण मी हीच अपेक्षा करतो कि त्यांनी हि दिवा बत्ती करावं देवा समोर .. कि असा विचार करता कि आज दिवसभर जे झालं ते झालं... पण देवा समोर दिवा लावला , अगरबत्ती , मेणबत्ती लावली कि मन प्रसन्न होतं , एक सकारात्मक ऊर्जा घरात निर्माण होते आणि घरातील सगळे एकत्र येण्याचा आणि प्रार्थना करायचा तो एक अनमोल क्षण असतो ... भले तो २ , ३ , ४ किंव...

आधी जगा !

का नाही कळत लोकांना - आज वाचले तर उदया बरंच काही करू शकतील आजच्या ह्या बिकट प्रसंगी आपल्याला एकच ध्येय दिसले पाहिजे - जगणे  ! अहो धर्म, जात, हे सगळं तेव्हाच टिकेल जेव्हा तुम्ही टिकाल .. कळते का ? काही बावळट लोक धर्मांध लोकांच्या बोलण्यात येऊन स्वतःचा आणि आख्या समुदयाला एक खाईत लोटत आहोत .. .. आहो देव घरी प्रार्थना करून ही मिळतो .. तिथे ही तो प्रसन्न होतो .. तो एखाद्या विशिष्ट जागेचा भुकेला नसतो .. मग का आपण हे जाणून सुद्धा आपल्या आणि आपल्या अवती भवति असलेल्या लोकांच्या जीवनाशी खेळतो आहोत? आहो घरात दूध नसेल तर ठीक .. १० दिवस बिनदुधाचा चहा प्या .. ज्यांच्या घरी तहणे बाळ असेल त्यांनी सुपेरमार्केट मधून बाकी काही आणण्यापेक्ष आधी दूध पाऊडर आणा .. आधी त्या बाळाची सोय करा .. तुम्ही काहीही खाऊन किंवा नुसते पानी पिऊन जगू शकता .. हे लक्षात ठेवा ही वेळ आपले प्राधान्य क्रम लावायची आहे .. न की आपले स्वार्थ जागे करायची .. आधी गरजूंना मदत करा मग स्वतःला ..

आरक्षण - माझे मत.

आरक्षण - माझे मत.  सध्या आरक्षणावर खूप जोर आहे. समाजाचा प्रत्येक घटक उठतो आणि आरक्षण मागतोय. पण हा विचार कोण करतंय का, कि भारता सारख्या अतिभव्य अश्या राष्ट्रात सगळ्यांनीच आरक्षण घेतले तर कोणाला काय मिळेल? याने आपण आपलया संधीची संभवनीयता कमी करतोय. १०% आरक्षण नसले तर आपल्याला पूर्ण १००% संभाव्य संधी उपलब्ध असतात. तेच आरक्षणानंतर १०० पैकी दहाच संभाव्य संध्या उपलब्ध होतात. हे म्हणजे पूर्ण केक खायची संधी असताना आपण फक्त एका तुकड्यात समाधानी होण्यासारखा आहे. सध्याचे युग स्पर्धात्मक आहे आणि दुर्दैवाने आरक्षणाच्या गाजरापायी आपण आपल्या नव्या युगाची लढाऊ वृत्ती बोथट करतो आहोत. हे नक्कीच पूर्ण राष्ट्रसाठी उपयुक्त नाही. आरक्षण, ते हि जाती वरून असल्यामुळे आणि त्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात वाढल्या मुळे, खऱ्या अर्थाने गरजू, हुशार, होतकरू विद्यार्थी / नागरिक पर्यायी देश सोडत आहेत. एका अभ्यासानुसार, भारतातून परदेशात स्थलांतरीत करणाऱ्यांची संख्या २००३ च्या तुलनेत २०१३ मध्ये ८५% ने वाढीव होती. आणि भयावह गोष्ट हि कि त्यातील ५५% पेक्षा अधिक हे शास्त्रज्ञ,गणितज्ञ, अर्थतज्ज्ञ, डॉक्टर, अभियं...