|| तमसो मा ज्योतिर्गमय ||


मित्रांनो,

आज हि बऱ्याच घरांमध्ये रोज नित्यनियमाने एका विशिष्ट वेळी देवा सोमोर दिवा किंवा मेणबत्ती लावली जाते. का?

अहो इथे तेल महाग झालंय तरी का पेटवता दिवा? काय असतं मनात त्या वेळेस?

हेच असेल नक्की कि काही होणार नाही दिवा वगैरे लावून ... उगाच लावायचा म्हणून लावतोय ... काही उपयोग नाही. मला एक तर किती त्रास आहे .. कर्ज आहे, कामाचा व्याप आहे, मुलीच्या लग्नाचं टेन्शन, आई वडीलांचं आजारपण, बापरे हे सगळं असताना मी काय देवा समोर दिवा लावतोय, उदबत्ती लावतोय, मेणबत्ती लावतोय .... मला माझं प्राधान्य कळत नाही .... वेडे आहेत मला हे रोज करावं असं सांगणारे किंवा सांगून गेलेले... बावळट होते माझे वाड-वडील आणि मीही तेवढाच बावळट आहे कारण माझ्या मुलांकडून पण मी हीच अपेक्षा करतो कि त्यांनी हि दिवा बत्ती करावं देवा समोर ..

कि असा विचार करता कि आज दिवसभर जे झालं ते झालं... पण देवा समोर दिवा लावला, अगरबत्ती, मेणबत्ती लावली कि मन प्रसन्न होतं, एक सकारात्मक ऊर्जा घरात निर्माण होते आणि घरातील सगळे एकत्र येण्याचा आणि प्रार्थना करायचा तो एक अनमोल क्षण असतो ... भले तो २, , ४ किंवा ३० मिनिटे असो. आणि हे करत असताना कळत नकळत आपण आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबियांसाठी त्या न पाहिलेल्या, न दिसणाऱ्या शक्तीकडे चांगले आरोग्य, मनःशांती मागतो .... यालाच सकारात्मक शक्तीचं आव्हान असं म्हणतात ना ?

मग जर आपण हे रोज करून आपल्या घरातील नकारात्मक शक्तींना सकारात्मक करत असतो, तर आज ह्या जागतिक समस्ये साठी आपल्या देशामध्ये, आपल्या लोकांमध्ये एक सकारात्मक ऊर्जेचा वावर व्हावा त्या साठी ५-१० मिनिटे दिवा नाही पेटवू शकत? अरे हो नाही नाही कारण आपल्याला तर मोदी द्वेष आहे ... त्याच्या द्वेषासमोर आपण आपली सद्सद्विवेक बुद्धी हि विसरतो ...

१३० कोटी जनतेला अश्या प्रसंगी एकत्र ठेवायची, सकारात्मक ठेवायची एकही संधी मोदीजी सोडत नाहीयेत ... किती उदाहरणे आहेत कि माणसाने आपल्या सकारात्मक विचाराने असाध्य ते साध्य करून दाखवल्याची .... अर्थात मागे सरकार त्याचे काम नक्कीच करत आहे आणि करेल असा माझा ठाम आत्मविश्वास आहे.

आपल्याला फक्त आपले कर्तव्य करायचंय - सुरक्षित राहायचंय, सकारात्मक राहायचंय ... बाकी तसं शतकवीर सचिन बाद झाल्यावर त्याला फलंदाजाचे धडे देणारे गल्ली गल्लीतले तज्ज्ञ आहेतच .... या सगळ्यांचं न ऐकता सचिन फक्त सराव करत होता .... आणि ते करत असताना त्याने दरवेळी जमावासमोर, खुले आम केल्याचं नाही आठवत ... हां मॅचच्या आधी मीडिया दाखवते तो त्याचा नेहमीचा सराव नसतो ....

असो .... जेवढे सकारत्मक दृष्ट्या सांगता येईल तेवढं सांगितलं ... बाकी विरोध अवहेलना होणारच हे ज्ञात आहेच ..... आणि हो नित्यनियमाने दिवा लावत असाल तर लावत रहा ... उगाच ते सोडून बसाल ...


|| तमसो मा ज्योतिर्गमय ||




विपुल कर्णिक

Comments