आधी जगा !
का नाही कळत लोकांना - आज वाचले तर उदया बरंच काही करू शकतील
आजच्या ह्या बिकट प्रसंगी आपल्याला एकच ध्येय दिसले पाहिजे - जगणे !
अहो धर्म, जात, हे सगळं तेव्हाच टिकेल जेव्हा तुम्ही टिकाल .. कळते का ?
काही बावळट लोक धर्मांध लोकांच्या बोलण्यात येऊन स्वतःचा आणि आख्या समुदयाला एक खाईत लोटत आहोत .. ..
आहो देव घरी प्रार्थना करून ही मिळतो .. तिथे ही तो प्रसन्न होतो .. तो एखाद्या विशिष्ट जागेचा भुकेला नसतो .. मग का आपण हे जाणून सुद्धा आपल्या आणि आपल्या अवती भवति असलेल्या लोकांच्या जीवनाशी खेळतो आहोत?
आहो घरात दूध नसेल तर ठीक .. १० दिवस बिनदुधाचा चहा प्या .. ज्यांच्या घरी तहणे बाळ असेल त्यांनी सुपेरमार्केट मधून बाकी काही आणण्यापेक्ष आधी दूध पाऊडर आणा .. आधी त्या बाळाची सोय करा .. तुम्ही काहीही खाऊन किंवा नुसते पानी पिऊन जगू शकता .. हे लक्षात ठेवा
ही वेळ आपले प्राधान्य क्रम लावायची आहे .. न की आपले स्वार्थ जागे करायची ..
आधी गरजूंना मदत करा मग स्वतःला ..
Comments
Post a Comment