आरक्षण - माझे मत.

आरक्षण - माझे मत. 

सध्या आरक्षणावर खूप जोर आहे. समाजाचा प्रत्येक घटक उठतो आणि आरक्षण मागतोय.

पण हा विचार कोण करतंय का, कि भारता सारख्या अतिभव्य अश्या राष्ट्रात सगळ्यांनीच आरक्षण घेतले तर कोणाला काय मिळेल? याने आपण आपलया संधीची संभवनीयता कमी करतोय. १०% आरक्षण नसले तर आपल्याला पूर्ण १००% संभाव्य संधी उपलब्ध असतात. तेच आरक्षणानंतर १०० पैकी दहाच संभाव्य संध्या उपलब्ध होतात. हे म्हणजे पूर्ण केक खायची संधी असताना आपण फक्त एका तुकड्यात समाधानी होण्यासारखा आहे.

सध्याचे युग स्पर्धात्मक आहे आणि दुर्दैवाने आरक्षणाच्या गाजरापायी आपण आपल्या नव्या युगाची लढाऊ वृत्ती बोथट करतो आहोत. हे नक्कीच पूर्ण राष्ट्रसाठी उपयुक्त नाही. आरक्षण, ते हि जाती वरून असल्यामुळे आणि त्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात वाढल्या मुळे, खऱ्या अर्थाने गरजू, हुशार, होतकरू विद्यार्थी / नागरिक पर्यायी देश सोडत आहेत. एका अभ्यासानुसार, भारतातून परदेशात स्थलांतरीत करणाऱ्यांची संख्या २००३ च्या तुलनेत २०१३ मध्ये ८५% ने वाढीव होती. आणि भयावह गोष्ट हि कि त्यातील ५५% पेक्षा अधिक हे शास्त्रज्ञ,गणितज्ञ, अर्थतज्ज्ञ, डॉक्टर, अभियंता हे आहेत.

आता हे सगळे ज्ञान आजच्या पिढीला कोण आणि कसे देणार? कॉम्पुटर, मोबाइलला, इंटरनेट आहेत ना, पण त्याच्यावर योग्य ते काय आणि कसे शोधायचे याचे ज्ञान देणारे अभ्यासू, जाणकार शिक्षक / गुरु नाहीत !! कारण शिक्षण क्षेत्रातही आरक्षण आहे !

राष्ट्र घडवणारे शिक्षक / गुरु हे तेजस्वी, अभ्यासू, ज्ञानी, स्वतःला अद्ययावत आणि कायम विनम्र असावेत. दुसरे काहीच मिळाले नाही म्हणून किंवा नाईलाज म्हणून हा पेशा पत्करणारे नकोत.

इतर प्रगत देशांमध्ये शिक्षकांची केली जाणारी निवड, त्याचे निकष आणि त्यांना मिळणारे मानधन, सवलती ह्या फार उच्च असतात आणि ते योग्य हि आहे. याच साठी कि राष्ट्र रक्षक सैनिकांनंतर राष्ट्र उभारणी करणारे शिक्षक / अध्यापक हे खूप महत्वाचे असतात.

माझ्या मते शिक्षकी पेशा आरक्षणापासून दूर ठेवला आणि तिकडे फक्त गुणवत्ता ग्रहाय्य धरली, तर राष्ट्रोन्नती झपाट्याने होईल आणि एक काळ असा येईल की राष्ट्राला आरक्षणाची गरजच भासणार नाही. कारण त्या शिक्षकांनी / गुरूंनी घडवलेला प्रत्येक शिष्य हा ह्या स्पर्धेत आत्मविश्वासाने भाग घेऊन यशस्वी होईल.


विपुल प्रफुल्ल कर्णिक 

Comments

  1. Great Start Vips ! Reservation is taking India on a reverse mode. You have rightly suggested about having no reservation in educational sector for the selection of teachers. Well worded, well drafted... Keep Writing !!

    ReplyDelete
  2. Blog is very much thoughtfull liked it very much...somewhere somebody should start this activity so that at least till nextgen everything should b fine in our India

    ReplyDelete

Post a Comment